Type Here to Get Search Results !

Add

सांस्कृतिक अनुदान योजना २०२५



सांस्कृतिक अनुदान २०२५

संक्षिप्त माहिती: महाराष्ट्राचा राज्य उत्सव गणेशोत्सव महाराष्ट्राच्या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजने अंतर्गत राज्यातील १८०० भजनी मंडळांना प्रत्येकी रु. २५,०००/- प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक अनुदान

भजनी मंडळ अनुदान २०२५

WWW.SUYOMS.COM 

JOIN WHATSAPP

Age Calculator

शासन निर्णय

⎆ राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा "राज्य महोत्सव" म्हणून साजरा करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुशंघाने राज्यातील गणेशोत्सवानिमित्त अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रोत्साहन देणे, विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करणारे उपक्रम उदा: विविध स्पर्धा, राज्यातील विद्यार्थ्यांना या राज्य उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे इ. उपक्रमांसह, गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सव' म्हणून साजरा करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. 

⎆ सदर राज्य महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणारे उपक्रम व इतर कार्यक्रमांचे समन्वयन कार्यालय म्हणून पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई या कार्यालयाला घोषित करण्यात येत आहे. तसेच सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विविध कार्यालयामार्फत व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खालील कार्ये प्रस्तावित आहेत.

१. सांस्कृतिक कार्य संचालनालय 

⎆ राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखरसांस्थाांनी प्रमाणित केलेल्या भजनी मांडळाांना भाांडवली खर्चासाठी अनुदान देण्यात येईल. या संदर्भातील अटी व शरतींचा शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. यासाठी ५ कोटी रुपये इतकी तरतूद करणे. 

⎆ राष्ट्रीय-आांतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रोत्साहन देण्यासाठी विविधउपक्रमाांचे स्थानिक सांस्थाांच्यासोबत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजन करणे.

⎆ गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचे आयोजन करणे. 

⎆ प्रामुख्याने राजधानीच्या शहरात ड्रोन शोचे आयोजन करणे. 

⎆ राज्य महोत्सव टपाल तिकीट काढणे. 

⎆ राज्य महोत्सव विशेष नाणे प्रसिद्ध करणे.

२. पु. ल. देशपांडे

⎆ उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कृत करणे. राज्यातील सुमारे ४८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुमारे १.५० कोटी रुपये इतक्या रकमेची पारितोषिक वितरीत करणे.

⎆ या स्पर्धांचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांकारिता पारितोषिक वितरण समारंभ अकादमी तर्फे आयोजित करणे.

⎆ गणेशोत्सवाचा निमित्ताने राज्य व्याख्यानमालेचे आयोजन करणे.

⎆ राज्यातील प्रमुख गणेश मंदिरे आणि सार्वजनिक गणेशोत्सव यांचे ऑनलाईन दर्शन करता यावे, या करिता एक पोर्टल निर्माण करणे.

⎆ घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्रे अपलोड करता यावीत, या करिता एक डिजिटल प्लॉटफॉर्म विकसित करणे.

⎆ या राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशभर व्हावी या करिता वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडीओ आणि समाज माध्यमे यांच्या माध्यमांतून देशभरात प्रचार व प्रसिद्ध करणे.

⎆ उपरोक्त बाबींचा एकत्रित शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.

⎆ दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव यांच्या माच्यामातून साजरा करण्यात येणारा गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप यावे, या अनुषंगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम हाती घेणे. 

⎆ गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरातून गणपती विषयक रिल्स स्पर्धा महसूल विभागीय व राज्य स्थरावर आयोजित करणे. 

⎆ ज्या मराठी चित्रपटांमधून गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा व प्रथा यांचे उत्तम चित्रण करण्यात आले आहे, अशा चित्रपटांचा गौरव करणे. 

४. सर्व जिल्हाधिकारी

⎆ उत्कृष्ट गणेशोत्सव मांडळ स्पर्धेसाठी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समित्या गठीत करणे, स्पर्धेसाठी अकादमी तर्फे पाठविण्यात आलेल्या अजाचे प्रत्यक्ष भेटीद्वारे समितीमार्फत परीक्षण करणे, गुणाांकन करणे व अंतिम निकालपत्र अकादमीकडे पाठविणे. 

⎆ राज्यस्थरीय पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आल्यानंतर तालुका व जिल्हास्थरीय [द्वितीय व तृतीय] विजेत्यांसाठी पारितोषिक वितरण समारंभ संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करणे. 

⎆ राज्य महोत्सवाच्या अनुशंघाने शहरातील प्रमुख ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई, विसर्जन मिरवणुकांचे संयोजन व समन्वयन करणे. 

⎆ शासन निर्णय मध्ये नमून उपक्रम, कार्यक्रम यांचे स्थानिक स्थरावर नियंत्रण, समन्वयन आणि प्रचार व प्रसिद्धी करणे.


ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

⎆ सर्वप्रथम आपण https://mahaanudan.org/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या 

पुढे संस्था / भजनी मंडळ नोंदणी या पर्यायाला क्लिक करा.

⎆ आता तुम्हाला समोर दिसत असलेली सर्व माहिती भरा 

⎆ व पुढे नोंदणी करा या बटनावर क्लिक करा.

⎆ आपली नोंदणी पूर्ण होईल त्या नंतर पुढे

⎆ आपण नोंदणी केलेला अर्ज लॉगीन करा.

⎆ लॉगीन करण्यासाठी आपला नोंदणी केलेला मोबाईल नंबर इंटर करा 

⎆ तुम्हाला एक ओटीपी तुमच्या मोबाईल नंबर वर येईल 

⎆ व अर्ज लॉगीन होईल आता पुढे तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील

१. भीमसेन जोशी अनुदान अर्ज 

२. सहायक अनुदान अर्ज 

३. भांडवली अनुदान अर्ज 

४. नाट्य निर्मिती अनुदान अर्ज 

५. भजनी मंडळी भांडवली अनुदान अर्ज 

⎆ या वरील पाच पर्यायांपैकी तुम्हाला पाचवा पर्याय निवड करायची आहे [ भजनी मंडळ भांडवली अर्ज ]

⎆ तुमच्या समोर असलेली सर्व माहिती भर व महत्वाची कागदपत्र अपलोड करा.

⎆ महत्वाची कागदपत्र :

१. ग्रामपंचायत दाखला 

२. केलेल्या कार्यक्रमाची मूळ छायाचित्र 

३. आयोजक पत्र 

४. कार्यक्रमांच्या संबंधित वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले वृत्तांत अथवा परीक्षणे (वृतांताचे नाव आणि वृतांताचा वर व दिनांक सह )

५. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका, हँडबिल, कार्यक्रमाच्या जाहिरातीचे कात्रण.

⎆ आता तुमची नोंदणी पूर्ण करा.

आमच्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद

👇🏻 महत्वाच्या लिंक 👇🏻


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Show ad in Posts/Pages